WHY DT
Grasping + Memorization + practices = 100% succes. Follow DT 'Tantra' is the success 'Mantra'
करंजाडे येथील सेक्टर ५ मधील शांत व प्रसन्न जागेत ‘दिव्या टयुटोरियल्सचे’ वर्ग चालतात. ‘दिव्या टयुटोरिअल्स’ च्या समोरच्या भागात एकही इमारत ( भविष्यात ) नसल्याने हवेशीर, प्रकाशमय व अभ्यासास उपयुक्त असे शांत वातावरण आहे. मुलांच्या सायकली व पालकांची वाहणे पार्क करण्यातही अडचण येत नाही. जवळच गावदेवीचे मंदीर असल्याने सकारात्मक उर्जा आहे. २ मिनिटांच्या अंतरावर बस स्थानक असल्यााने येणे जाणे सोयिस्कर आहे. पोलिस चौकीही थोड्याच अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता येते. थोडक्यात, करंजाडे येथील ‘‘शिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र’’ म्हणजेच ‘ दिव्या टयुटोरियल्स ’ असे म्हटले जाते.
‘दिव्या टयुटोरिअल्स ’ चे एकुन पाच हवशीर वर्ग आहेत. ज्या वर्गात २० विदयार्थी आरामात बसू शकतात . काही वर्ग वातानुकुलीत आहेत. बसण्यासाठी उत्तम प्रतीचे ‘बेंचेस आहेत. प्रत्येक वर्गात व्हाईट बोर्ड असून आवश्यक तेथे प्रोजेक्टर लावण्याचे सोय आहे.
प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमरा असून त्याचे चित्रीकरण Live किंवा Recorded पाहता येते. व्यवस्थापनाची प्रत्येक वर्गातील विदयार्थी व शिक्षकांवर कडी नजर असते. कोणत्याही वर्गात बेशिस्त वातावरण, वेळखाऊ उपक्रम किंवा अनावश्यक चर्चा होत असल्यास ताबडतोब सूचना दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांनी कोणतीही तक्रार केल्यास त्याबाबत रेकोर्डिंग पाहून त्या तक्रारीची शहानिशा केली जाते.
लोड शेडींगमुळे पंखे अथवा लाईटस बंद पडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येवू नये यासाठी इनव्र्हटरची योजना आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला म्हणून क्लास रदद होत नाहीत. ज्यांच्या घरी वारंवार विदयुतपुरवठा खंडीत होतो त्या घरातील विदयार्थी ‘पूर्व परवानगी’ घेवून अभ्यासासाठी क्लासला येवू शकतात. हा आणखी एक फायदा.
हजेरी घेण्यात शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जावू नये यासाठी ‘बायोमॅट्रीक प्रेजेंटी’ घेतली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेवून विद्यार्थ्यांची क्लासला येण्याची वेळ व क्लासमधून निघण्याची वेळ नोंद केली जाते. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळा केव्हाही कळू शकतात.
आजच्या तांत्रिक युगात केवळ पुस्तके हेच शिक्षणाचे माध्यम नसुन इंटरनेट यू-टयुब या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे विषय समजून घेता येतो. एखादा न समजलेला विषय समजून घेता येतो. एखादा न समजलेला विषय समजून घेण्यासाठी त्या विषयवरील अनेक व्हिडीओ यु-टयुबवर उपलब्ध असतात. तसेच पालकांच्या स्मार्टफोन मध्ये सुंदर अॅप डाऊनलोड करता येतात. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
www.dteducares.com या वेबसाईटवर पालक दिव्या टयुटोरिअल्स विषयी अधिक माहिती जाणून घेवू शकतात. तसेच जर विद्यार्थ्यांची प्रगती पहायची असेल तर त्याचा password type करुन त्याची उपस्थिती, निकाल, इ. ची माहिती जाणून घेवू शकतात.
प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासाचे नियमित वेळापत्रक मिळते. तेवढीच वहया पुस्तके त्याने आणावयाची आहेत. अनावश्यक ओझे आणावयाचे नाही.
दिव्या टयुटोरियल्सचा वर्ग हा डबल प्रशिक्षित वर्ग असतो. म्हणजे त्यांची शैक्षणिक डिग्री घेतल्यानंतरही त्यांना संस्थेकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक असतो.
असे काही शिक्षक आहेत की, जे कोणताही विषय तितक्याच समर्थपणे शिकवू शकतात. अशा शिक्षकांची special team दिव्या टयुटोरिअलमध्ये आहे. नियमित शिक्षक अनुपस्थित असल्यास हे शिक्षक वर्गाची जबाबदारी घेतात. त्यामुळे कोणताही शिक्षक गैरहजर असला तरी मुलांचे नुकसान होत नाही.
एखादया बॅचमध्ये ४ पेक्षा कमी विदयार्थी असतील तर स्वतंत्र बॅच घेता येत नाही. अशावेळी समान मिडीयम व बोर्ड असलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप टयुशन्स’ घेतले जाते. या ग्रुप टयुशनमध्ये एकावेळी एकापेक्षा अधिक शिक्षक असू शकतात.
काही पालकांना अपरीहार्य कारणास्तव मुलांना क्लासला पाठवता येत नाही. त्यांच्यासाठी आमच्याकडे होम ट्यूशन्स व्यवस्था आहे.
आजच्या महागाईच्या काळात पालकांना एकदम फी भरता येत नाही म्हणून फी 4 ते 6 हप्त्यात भरण्याची सुविधा आहे. तसेच हुशार मुलांना सवलत व पालकांच्या / विद्यार्थ्यांच्या शिफारसीने विदयार्थी आल्यास त्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात फी कमी केली जाते.
विद्यार्थ्यांच्या ‘गुणांना’ वाव देण्यासाठी विविध उपक्रमांव्दारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. पैकिंच्या पैकी गुण मिळवणे, वर्गाचे मोनीटर होणे, विशेष कौशल्य प्रदर्शित करणे यासाठी रोख किंवा पुस्तकरूपाने बक्षिसे दिली जातात.
प्रार्थनेने कोणत्याही गोष्टीची सुरूवात केल्यास मन प्रसन्न राहते. आपल्या क्लासमध्ये सकाळी व सायंकाळी प्रार्थना केली जाते.
प्रार्थनेनंतर लगेचच मराठी व इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन केले जाते. त्यातुन विदयार्थीची एकाग्रता, श्रवणकौशल्याची वाढ होते. (वाचलेल्या वृत्तावर आधारित प्रश्न विचारले जातात.)
गणित, इंग्रजी, विज्ञानासारखे महत्वाचे विषय सुरू करण्यापूर्वी. त्या – त्या विषयांचे मूलभुत ज्ञान पक्के करण्यासाठी ‘‘Foundation Course’’ घेतला जातो. हा कोर्स ‘‘सुटटीच्या’’ कालावधीत घेतला जातो.
‘‘यशस्वी पालकत्व’’ या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी त्या – त्या विषयातील तज्ञ आमंत्रीत केले जातात.
विद्यार्थी व पालक यांच्यावर शिक्षणाचा मानसिक ताण पडू नये. याकरिता आम्ही तणावमुक्त शिक्षणपध्पतीचा अवलंब करतो. यात ऐच्छिक होमवर्क (होमवर्कची सक्ती नाही ), हसत खेळत शिक्षण, उपक्रमांव्दारे शिक्षण इ. प्रयोग केले जातात. त्यातून मुलांना अभ्यासाची गोडी लागून प्रगती चांगली होते. मुलांना क्लासमध्ये होमवर्क पूर्ण करण्यास मदत करणे हा या उपक्रमाचाच भाग आहे.
‘‘Unique point system’’ ही एक अशी संकल्पना आहे. जी फक्त आपणास ‘दिव्या टयुटोरिअल्स’ मध्ये पहावयास मिळेल. या सिस्टमद्वारे विद्यार्थ्यास वक्तशिरपणा, नियमितपणा, शिस्त, प्रगती, इ. सर्वांसाठी गुण मिळतात. सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वर्गात ‘मोनिटर’ चा दर्जा दिला जातो. तसेच त्याला बक्षिसे / फी सवलत मिळण्याची संधी दिली जाते.
पालकांनी मागणी केल्यास एकाच ठिकाणाहून क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केली जाते. या फॅसिलिटीसाठी पालकांना योग्य तो मोबदला फी व्यतिरिक्त दयावा लागतो.